अभिनंदन यांची ‘वीरचक्र’ पुरस्कारासाठी हवाई दलाकडून शिफारस

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचे एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. पाकिस्तानचे एफ-16 विमान पिटाळून लावणारे आणि पाडणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना हवाई दलाकडून वीरचक्र या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
भारतीय हवाई दालचे विंग कमांडर यांना त्यांच्या शौर्यासाठी हवाई दलाकडून वीरचक्र पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलावामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केले.
त्यामुळे पाकिस्तानने एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसले.
याबाबतची माहिती मिळताच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी विमानांना पिटाळून लावले.
तसेच एफ-16 विमानाला पाडण्यात अभिनंदन यांना मोठे यश मिळाले.
मात्र त्यांच्या विमान कोसळल्याने ते पॅराशूटच्या सहाय्याने पाकव्यापत कश्मिरमध्ये पडले.
पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना त्यांच्या ताब्यात घेतले होते.
पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले असून सुद्धा कणखरपणाने आणि निडरताने उत्तर देत असल्यामुळे त्यांना या पुरस्करासाठी शिफारस केली.
अभिनंदन यांच्या नावासह हवाई हल्ले करणार्या 12 वैमानिकांची वायुसेना पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे.