विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र करणार प्रदान

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पदक प्रदान करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अभिनंदन यांना स्वातंत्र्य दिनी वीरचक्र पदक प्रदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 लढाऊ विमान पाडल्यामुळे वीरचक्र देत असल्याचे समोर आले आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पदक –

भारतीय हवाई दालचे विंग कमांडर यांना त्यांच्या शौर्यासाठी हवाई दलाकडून वीरचक्र पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलावामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केले.

त्यामुळे पाकिस्तानने एफ-16 विमान भारतीय हद्दीत घुसखोरी केली.

याबाबतची माहिती मिळताच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी विमानांना पिटाळून लावले.

तसेच एफ-16 विमानाला पाडण्यात अभिनंदन यांना मोठे यश मिळाले.

मात्र त्यांच्या विमान कोसळल्याने ते पॅराशूटच्या सहाय्याने पाकव्यापत कश्मिरमध्ये पडले.

पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना त्यांच्या ताब्यात घेतले होते.

पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले असून सुद्धा कणखरपणाने आणि निडरताने उत्तर देत असल्यामुळे त्यांना या पुरस्करासाठी शिफारस केली.

अभिनंदन यांच्या नावासह हवाई हल्‍ले करणार्‍या 12 वैमानिकांची वायुसेना पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे.

 

 

 

Exit mobile version