Wed. Dec 1st, 2021

#WelcomeBackAbhinandan : अभिनंदन आज मायदेशी परतणार

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. मात्र अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका करण्याचा निर्णय पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. गुरुवारी संसदेत बोलत असताना इम्रान खान यांनीही घोषणा केली. आम्ही शांततेसाठी भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले आहे. सध्या भारत- पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या चर्चा न करता पाकिस्तानने भारतीय वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे असे भारताने पाकिस्तानाला ठणकावले.

अभिनंदन यांची सुटका –

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशकवादी तळांवर हल्ला केला.

दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे तीन विमानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली.

त्यानंतर भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान विमानांचा पाठलाग करत असताना मिग विमान दुर्घटानग्रस्त झाला.

त्या विमानाचे वैमानिक अभिनंदन पाकिस्तान हद्दीत पडले.

याची माहिती मिळातच पाकिस्तानने अभिनंदन यांनी आपल्या ताब्यात घेत. त्यांचे व्हिडीओ प्रसिद्ध केले.

भारताने पाकिस्तानकडे त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.

मात्र गुरुवारी इम्रान खान यांनी अभिनंदनची सुटका करणार असल्याची घोषणा केली.

अभिनंदन यांना आज वाघा बॉर्डरमार्गे भारतात सोडत असल्याचे समजते आहे.

यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष वाघा बॉर्डरवर लागले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *