Sat. Nov 27th, 2021

#AbhinandanVarthaman : कधी परतणार अभिनंदन भारतात?

भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांना उद्धवस्त केले. म्हणून पाकिस्तानने बुधवारी तीन विमानानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली. मात्र भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या विमानांना पळवून लावले. मात्र हवाई दल प्रत्युत्तर देताना पाकिस्तान हद्दीत भारताचे मिग विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात आले. पाकिस्तानने अभिनंदन यांचे व्हिडीओ प्रसिद्धही केले आहेत. यामुळे सध्या अभिनंदन यांना भारतात कसे सुरक्षित परत आण्याचे याचा विचार सुरू आहे.  मात्र जिनिव्हा करारानुसार पाकिस्तानला अभिनंदन यांना भारतात परत पाठवावेच लागेल असे एका मेजर जनरल यांनी सांगितले. कारगिल युद्धादरम्यान, भारताचे के. नचिकेता हे सुद्धा पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते. मात्र पाकिस्तानला के. नचिकेता यांना आठ दिवसांत रेड क्रॉसच्या ताब्यात देण्यात आले, असे मेजरने यावेळी सांगितले आहे.

काय म्हणाले मेजर जनरल ?

जर भारताच्या वैमानिकाला काही त्रास झाला तर जिनिव्हा कराराचे उल्लंघन होईल.

तसेच आंतराष्ट्रीय स्तारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

कारगिल युद्धावेळी पाकिस्तानला कॅप्टन नचिकेता यांना आठ दिवसात परत करावे लागले.

जर जिनिव्हा कराराचे उल्लंघन पाकिस्तानने केले तर त्यांना मोठे महागात पडेल.

तसेच भारतीय वैमानिकाला त्याप्रमाणे मेडिकल सुविधा उपलब्ध होईल ज्याप्रमाणे ते आपल्या देशात ड्युटीवर कार्यरत असतात.

तसेच यावेळी त्यांना कुठल्याही गोष्टीची माहिती सांगण्यास जबरदस्ती करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर त्यांची खाण्या- पिण्याचीही सोय त्यांना करावी लागते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *