Fri. Sep 30th, 2022

श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडीओ इन्टाग्राम वर शेअर केला

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पती अभिनव कोहली यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनव कोहलीने त्याच्या इन्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केले होता. या व्हिडिओत श्वेता तिवारी ही मुलाला एकटं सोडून दक्षिण अाफ्रिकेला गेल्याचा आरोप अभिनवने केला होता. माझा मुलगा कुठे आहे? असा सवाल श्वेताला अभिनवने केला होता. आता मात्र श्वेताने अभिनववर काही आरोप केले आहेत. एका मुलाखतीत श्वेता म्हणाली, “मी केपटाऊनला रेयांश, त्याची आया आणि आईला सोबत आणलं असतं, पण अभिनवने यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा सहमती दिली नाही. मी रेयांनशच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.” असे आरोप श्वेताने केले आहेत. श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे. श्वेताने केलेला दावा खोटा असल्याचं त्याने म्हटलं आहे. अभिनवने श्वेतावर पुन्हा अनेक आरोप केले आहेत. तो म्हणाला, ” तू मुलाखतीत म्हणालीस की मी मुलांच्या संगोपनासाठी एक रुपया खर्च केला नाही. तुला जराही लाज वाटत नाही. जेव्हा मी अर्जुन बिजलानीसोबत शो केला…त्य़ानंतरही शो केले… जवळपास ४० टक्के मी माझ्या अकाऊंमधऊन तुझ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले आहेत. पैसे पचवतेसही आणि म्हणते मी पैसे खर्च करत नाही. तू एकटीच पैसे खर्च करतेयस.” असं म्हणत अभिनवने श्वेताने केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. तसेच अभिनवने श्वेताचे इतर आरोपही बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. “श्वेता खोटं बोलणं थांबव. तू जर मला इतके कॉल केले होतेस तर जरा क़ॉल रेकॉर्ड दाखवं. “असं म्हणत श्वेताने फोन केला नसल्याचं तो म्हणाला आहे. या व्हिडीओत अभिनव कायदेशीररित्या आता पावलं उचलणार असल्याचं म्हणाला आहे. पुढे तो म्हणाला, ” इथे महामारी सुरू आहे. लोक कसे बसे जगत आहेत..आणि तू सगळं सोडून केपटाउनला गेलीस. तिसरी लाट तर लहान मुलांसाठी जास्त धोका दायक आहे. अशा वेळेत तू सर्व काही सोडून गेली कारण तुला फक्त पैसै कमवायचे आहेत. पैशाची एवढी कमतरता भासली की तू महामारीत मुलाला सोडून गेलीस. ” असे आरोप त्याने केले आहेत. अभिनव आणि श्वेताता वाद हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोघांमधील आरोप प्रत्यारोपांतच्या फैरी सुरूच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.