Thu. Aug 13th, 2020

अल- कायदाच्या काश्मीर युनिटला हादरा, पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था, जम्मू- काश्मीर

 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अल कायदाच्या झाकीर मुसा गटातील हे दहशतवादी असल्याची माहिती मिळते. या कारवाईमुळे अल-कायदाच्या काश्मीर युनिटला मोठा हादरा बसला.

 

पुलवामा जिल्ह्यातल्या ट्रालमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सुरक्षा दलाच्या पथकांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरु केली.

 

यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. सुरक्षा दलांनी यावर्षी 16 जुलैपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये 104 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *