Mon. Aug 10th, 2020

मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल

मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल झाली आहे. मध्य रेल्वेवर 18 जानेवारीपासून ही एसी लोकल धावणार आहे. ही एसी लोकल काल मंगळवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

मध्य रेल्वेवरील ही पहिलीच वातानुकूलित रेल्वे आहे. या एसी लोकलमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि गारेगार होणार आहे.

या एसी लोकलच्या खिडकींच्या काचा सामान्य लोकलच्या तुलनेत मोठ्या आहेत. या एसी लोकलमध्ये प्रवाशांना ‘टॉक बॅक सिस्टीमद्वारे’ मोटरमनशी संवाद साधता येणार आहे.

या एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘अलार्म सिस्टीमची’ बसवण्यात आली आहे. तसेच या एसी रेल्वेची निर्मिती चेन्नईमधील आयसीएफमध्ये करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर सर्वात आधी एसी लोकल सुरू करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *