Thu. Jul 18th, 2019

पश्चिम रेल्वेच्या पहिल्या AC लोकलची एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई !

0Shares

पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या देशातील पहिल्या एसी लोकलने एप्रिल महिन्यात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अवघ्या महिन्याभरात एसी लोकलने प्रशासनाला 1 कोटी 84 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीये.

25 डिसेंबर 2017 पासून सुरू झालेल्या एसी लोकलच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील हा सर्वाधिक महसूल आहे.

गेल्या 16 महिन्यांत एप्रिल महिन्याइतकी कमाई एसी लोकलने केली नव्हती.

मात्र मुंबईतील उन्हाच्या झळांनी गारेगार लोकलची गरमागरम कमाई झाली आहे.

एप्रिल महिन्यात तब्बल 4 लाख 47 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

याआधी 2018 मधील ऑक्टोबर महिन्यात एसी लोकलने 1 कोटी 82 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर त्याआधी 2018 सालातील मे महिन्यात एसी लोकलने 1 कोटी 68 लाख रुपयांचा महसूल मिळवत रेकॉर्डब्रेक कमाईची नोंद केली आहे.

एसी लोकल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या लोकलने सुमारे 24 कोटी रुपायंचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

दरम्यान, एसी लोकलचे तिकिट पहिल्या सहा महिन्यांसाठी सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी तिकिटाच्या 1.2 पट अधिक ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते 1.3 पट वाढवण्याचा विचार झाला होता. परंतु, प्रवाशांच्या प्रतिसादामुळे 24 एप्रिल 2019पर्यंत या वाढीला मुदतवाढ मिळाली होती. त्यात एप्रिल महिन्यातील रेकॉर्डब्रेक कमाईमुळे प्रस्तावित वाढीला 31 मे पर्यंत मुदतवाढ दिल्याचे प्रशासनाने सांगितले.

2018-19 या आर्थिक वर्षात एसी लोकलने तब्बल 19 कोटींची कमाई केली आहे. तूर्तास सोमवार ते शुक्रवार दरम्यान चर्चगेट ते विरार या स्थानकांसाठी एसी लोकलच्या 12 फेर्‍या चालवण्यात येत आहेत. त्यात कोणताही बदल करण्याचा विचार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *