Tue. Aug 9th, 2022

राज्यात राजकीय घडामोडींना वेग

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र समोर आले आहे. राज्याच्या राजकारणासाठी उद्याच्या दिवस महत्वाचा ठरवणार आहे. उद्याच्या दिवसाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील संघर्ष शिगेला पोहचताना दिसत आहे. अग्निपरीक्षेसाठी विधान भवनात वेगाने तयारी सुरू झाली आहे. तर विधान भवन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. सर्वपक्षीय नेत्यांची आढावा घेण्यासाठी विधान भवनात लगबग चालू आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सागर बंगल्यावर बैठक होणार आहे असे कळते आहे. उद्याच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. तर दुसरी कडे शिवसेनेची मातोश्री बंगल्यावर बैठक होणार आहे. सर्वत्र बैठकीचा जोर वाढला आहे.

एकनाथ शिंदे बंडखोरी प्रकरणावरून भाजपाच्या बैठकांचं सत्र वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बंडखोरी प्रकरणावर भाजपाकडून अद्याप कोणतीही पाऊल उचललं नाही. दरम्यान भाजपाच्या बैठका घेण्याचं प्रमाण वाढल्याने नेमकी कोणती रणनीती आखली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सागर बंगल्यावर बैठक होणार आहे .इतकेच नव्हे तर भाजपच्या सर्व आमदारांना आज मुंबई मध्ये दाखल होण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. बैठकीत उद्याच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे . एकीकडे बैठकांचा जोर चालू असताना संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बंडखोर आमदार आज गोव्याला रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहिती नुसार गोव्यातील ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये ७१ खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत.यानंतर सर्व आमदार गुरुवारी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे बहुमत चाचणीसाठी मुंबईत हजर राहतील.

Politics | राज्यात राजकीय घडामोडींना वेग | Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.