Fri. Jan 28th, 2022

नाशकात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी तयारीला वेग

   ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन रद्द करण्यात आले होते. आता ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारख्या जाहीर झाल्या असून साहित्य संमेलनासाठीच्या तयारीला वेग आला आहे.

  नाशकात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी आता तयारीला वेग आलाअसून तब्बल ७००० नागरिकांच्या क्षमतेचा जर्मन स्ट्रक्चर असलेला सभामंडप बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे ६० मीटर रुंद तर २५० मीटर लांब असलेल्या या सभा मंडपात १२ एलईडी स्क्रिन तर ५ प्रवेशद्वार असणार आहेत. तसेच ८०×४५ मापाचा ३ स्टेप असलेला स्टेज बांधण्यात येत आहे.

  येत्या ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नामांकित अतिथी येणार आहेत. या संमेलनात सलग ३ दिवस मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. स्वागताध्यक्ष असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या देखरेखीखाली ही सर्व तयारी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *