Sat. Nov 27th, 2021

भरधाव वेगातील कार विद्यूत ट्रान्सफार्मवर आदळल्याने भीषण अपघात

राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नुकताच कल्याण विशाखापट्टणम मार्गावर अपघात झाला आहे.

कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भरधाव वेगातील इंडिका कार ट्रांसफार्मरला धडकली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना गेवराई तालुक्यातील तांदळा गावाजवळ घडली आहे.

या अपघातात आणखी एकजण गंभीर जखमी आहे. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबेजोगाईवरून नगरकडे जाणाऱ्या इंडिका कारच्या चालकाचा ताबा सुटून इंडिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत ट्रांसफार्मरवर धडकली. त्यामुळे ट्रांसफार्मर गाडीवर पडला या अपघातात तीन जागीच मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी होते. यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघात एवढा भयानक धडकेच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *