Jaimaharashtra news

ती IceCream आणायला गेली आणि…..

जयभवानी नगरमध्ये पाण्याचा टँकर रिव्हर्स घेताना पाठीमागच्या चाकाखाली येऊन एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. नेहा गौतम दंडे असे त्या मुलीचे नाव आहे. आईस्क्रीम जिवावर बेतली अनिता गायकवाड यांच्या घरमालकाचे सुमेध किराणा दुकान आहे. या दुकानातून नेहा आईस्क्रीमचा कोन आणण्यासाठी गेली होती. तीने आईस्क्रीमचा कोन घेतला. तिथून घरी परतत असतानाच ती टँकरच्या चाकाखाली आली. तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामधील मुदळके येथे राहणाऱ्या पार्वतीबाई गौतम दंडे या त्यांची मोठी मुलगी अनिता गायकवाडला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच आल्या होत्या.

त्यांच्या सोबत त्यांची नऊ वर्षाची नेहा मुलगी देखील आली होती.

नेहमी प्रमाणे जयभवानी नगरातील गल्ली नंबर 11 मध्ये पाण्याचे टँकर आले. पाण्याचे टँकर आल्यामुळे पाणी भरण्याची लगबग सुरु झाली होती.

टँकर रिकामे झाल्यानंतर चालकाने टँकर रिर्व्हस घेण्यास सुरुवात केली आणि नेहा मागच्या चाकाखाली सापडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान अपघात झाला म्हणून घाबरलेल्या पाण्याच्या टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची नोंद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version