Jaimaharashtra news

मुंबई-पुणे महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात

मुंबई-पुणे महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री ३ च्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.

तमिळनाडुहून पेपरचे रोल घेऊन मुंबईकडे येणाऱ्या ट्रकने कारला मागून धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला.

तसेच ट्रकमधील पेपर रोल रस्त्यावर पसरला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातात जखमी झालेल्यांना कोमोठ्या मधील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

तर अपघातात मृत्यू झालेल्याला खोपोली ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version