Fri. Jan 21st, 2022

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; 9 जण ठार

जय महाराष्ट्र, पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रक ला मागून धडक दिल्याने एसटी बस अपघात झाला आहे. यामध्ये एसटी  बस मधील 7 आणि ट्रक मधील 2  असे एकूण

9 जण ठार झालेत तर 13 प्रवासी जबर जखमी झाले आहेत.

 

 

पुणे शिवाजीनगर आगाराची ञ्यंबकेश्वर-पुणे बस क्रमांक एम.एच. 14 बी.टी.4351  ही बस पुण्याकडे जात असताना पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावच्या मुक्ताई धाब्याजवळ

मध्यरात्री 1.30 वाजता हि घटना घडली.  

 

कांद्याच्या गोणीने भरलेला ट्रक पंचर झाला होता आणि पंचर काढण्यासाठी ट्रक चालक आणि क्लीनर दोघे खाली उतरून जॅक लावत असताना धडक बसल्याने हे दोघेही यात मृत झाले

आहेत. अपघात  एवढा भीषण होता कि एसटी बसचा अर्धा भाग कापला गेला आहे.

 

बसमध्ये एकुण 27 प्रवासी प्रवास करीत होते, त्यातील 7 प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला आहे, तर 13 गंभीर जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी नाशिक , ञ्यंबकेश्वर, नाशिक, सटाणा

परिसरातील आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *