Sun. Oct 17th, 2021

शालेय सहलीच्या एसटीला अपघात, 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गंभीर

एसटी महामंडळाच्या गाड्यांना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान नुकताच जुना मुंबई-पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात शाळेतील 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे चार वाजता शालेय सहलीची बस तळेगाव खिंडीजवळ आली असताना महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव बसने पाठीमागून जोरात धडक दिली. यामुळे ट्रॉली महामार्गावर उलटली.

यावेळी बसमध्ये एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी आणि शिक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी महामार्गालगत असलेल्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तळेगांव दाभाडे पोलीसांनी धाव घेत जखमींना मदत केली.

या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. संगमनेर येथील बी जे खताळ विद्यालय धांदरफळ येथील हे सर्व विद्यार्थी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *