Thu. Mar 4th, 2021

बायडेन यांनी ट्रम्पचे काही निर्णय केले रद्द

अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन यांनी आणि ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. अमेरिकेतील या सत्तांतराची प्रतीक्षा अमेरिकेबाहेरीलही कित्येकांना होती. ‘आजचा दिवस अमेरिकेसाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा आहे’ असं अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं. शपथविधीनंतर अवघ्या काही तासांमध्ये बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

बायडेन यांनी पहिल्या दिवशी संध्याकाळी ओव्हल येथील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात हजेरी लावत १७ अध्यादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यापैकी जवळजवळ सर्वच निर्णय हे ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय असून हे रद्द करण्यात आले आहेत. अंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामान बदल विषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात महत्वपूर्ण घोषणा करत या करारामधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा ट्रम्प यांचा निर्णय मागे घेतला आहे. शिवाय राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामान बदल विषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अशी माहिती सीएनएन दिली आहे. बायडेनने जवळजवळ सर्वच निर्णय ट्रम्प यांनी घेतलेले रद्द करण्यात केले आहे.

बायडेन यांनी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अध्यादेश जारी केले

  • सर्वसामान्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत देण्यासंदर्भात केली घोषणा
  • वर्णद्वेष संपवण्यासंदर्भात केला महत्वाचा निर्णय
  • अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द असून या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवण्यात आला.
  • जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय
  • ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदांमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
  • पॅरिस हवामानबदल करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार
  • ट्रम्प प्रशासनाने मुस्लीम आणि आफ्रिकन देशांवर घातलेली बंदी हटवण्यात आली
  • विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचाराबरोबरच राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात या निर्णयासंदर्भातील कल्पना दिली होती. कोरोनामुळे ४ लाख अमेरिकींचा झालेला मृत्यू, लाखोंवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, उद्योगांची झालेली वाताहत, अमेरिकेमध्ये कधीही नव्हता इतका उफाळलेला वंशभेद आणि वर्णभेद अशी निराशाजनक, भीतिदायक परिस्थिती बायडेन-हॅरिस यांच्या आधीच्या प्रशासनाच्या बेफिकीर कारभारामुळे निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर आश्वासक फुंकर घालण्याचा प्रयत्न बायडेन यांनी भाषणातून केला. अमेरिकेने यापूर्वीही संकटे पाहिली. असे अनेक संकटे एकाच काळात आलेली नव्हती. अशा वेळी ऐक्य हेच आपले प्रभावी शस्त्र बनू शकते, असं बायडेन यांनी त्यांच्या भाषणातून म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *