कृती समितीचा गुणरत्न सदावर्तेंना हटवण्याचा निर्णय

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा देत न्यायालयात त्यांची बाजू मांडली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी संघटनेने वकील गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या कृती समितीची शरद पवार आणि अनिल परब यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा येण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे. तसेच याप्रकणी न्यायालयीन लढाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांना एसटी प्रकरणावरून हटवून आता त्यांचीजागी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. एसटी कर्मचारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या जागी आता वकील सतीश पेंडसे हे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयात युक्तीवाद लढवण्याची जबाबदारी सोपावण्यात आली असल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेने दिली आहे.
विलीनीकरणाचा विषय न्यायप्रविष्ट – शरद पवार
विलीनीकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा कामावर येण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
Visit Mediafire Movies for SEnuke Cracked, Hotfile Downloads and more.|Visit rapidshare movies for XRumer Cracked, cracked softwares and more.