Mon. Dec 6th, 2021

शाळांच्या मुजोर कारभारा विरोधात उपसंचालकांची कारवाई

आठ शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव. यामध्ये नवी मुंबईतील ५, मुंबई मधील २ तर पनवेल मधील १ अश्या ८ शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोरोना महामारी मध्ये लॉकडाऊन असताना देखिल शाळेची फी वाढ करणे, पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावणे, फी न भरल्याने निकालपत्र न दाखवणे,विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे, तसेच फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी नवी मुंबई, मुंबई आणि पनवेल महापालिकेने मुंबई उपसंचालकांकडे केली होती. या मागणी नुसार मुंबई विभागीय उपसंचालकांनी आता पुणे येथील शिक्षण संचालकांना या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे मुजोर शिक्षणसंस्थाना चांगलाच दणका भेटला असून यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोणत्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय.पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून

नवी मुंबई
अमृता विद्यालय, नेरुळ
न्यू हॉरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली
रायन इंटरनॅशनल स्कुल, सानपाडा
सेंट लॉरेन्स स्कुल, वाशी
तेरणा ऑरचिड इंटरनॅशनल स्कुल, कोपरखैरणे

मुंबई
बिल्लाबॉग इंटरनॅशनल स्कुल, मालाड
बिल्लाबॉग इंटरनॅशनल स्कुल, सांताक्रूझ

पनवेल
विश्वज्योत हायस्कुल, खारघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *