Sat. Jul 31st, 2021

Corona : कोरोनासंदर्भात अफवा पसरवल्यास कारवाई होणार

राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचं आवाहन सरकारमार्फत केलं जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही खोडसाळ लोकांकडून अफवा पसरवल्या जात आहेत.

या अफवांमुळे समाजातील लोकांचं लक्ष विचलित होत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. सरकारकडून अशा अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका. माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका. याप्रकारे आवाहन केलं जात आहे.

कोरोनाच्या तपासणीसाठी रक्त चाचणी होत नाही – आरोग्यमंत्री

परंतु या आवाहनानंतर देखील काही समाजविघातक लोकं सोशल मीडियातून खोटी माहिती तसेच अफवा पसरवत आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यां विरोधात सायबर पोलीस विभागाततर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुक्कुटपालन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कुक्कुट उत्पादनाद्वारे #coronavirus मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येत असून अशा अफवांविषयी नागरिकांनी दक्ष रहावं, असं आवाहन मंत्री सुनिल केदार यांनी केलं आहे.

दरम्यान कोरोना संदर्भात अफवा पसरवणाऱ्या विरोधात पहिला गुन्हा पुण्यात नोंदवण्यात आला आहे.

कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *