Wed. Jun 26th, 2019

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पंचोलीविरोधात गुन्हा दाखल   

0Shares

अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात एका मोटर मेकॅनिकने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गाडीच्या दुरुस्तीची रक्कम देण्यास नकार देऊन आदित्यने धमकावले, अशी तक्रार त्याने केली आहे.

या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार मोहसीन राजपकर हे आदित्य पांचोलीला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांनी यापूर्वीही आदित्यच्या गाडीची दुरुस्ती केली होती.

आदित्यने 2017 मध्ये त्याची कार दुरुस्त करण्यासाठी फोन करून घरी बोलावलं होते.

त्यांची लॅण्ड क्रूझर ही गाडी पूर्णपणे बंद पडली होती आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च 2 लाख 82 हजार इतका आला.

हा खर्च मागण्यासाठी आदित्य यांना वारंवार संपर्क साधला.

त्यांनी पैसे न देता उलट शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असे मोहसीनने लेखी तक्रारीत म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: