Fri. Oct 7th, 2022

अभिनेता अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेते बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची टेस्ट करून घ्या असं आवाहन बच्चन यांनी केलं आहे.

विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. यापूर्वी जुलै २०२० मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र आणि अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावेळी अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, सून ऐश्वर्या रॉय बच्चन यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता.

अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

‘कौन बनेगा करोडपती १४’  हा कार्यक्रम ७ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कार्यक्रमच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ‘कौन बनेगा करोडपती १४’चे शूटिंगलादेखील ब्रेक लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.