महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

महानायक अमिताभ बच्चन यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. यावेळेस बच्चन कुटुंबीय उपस्थित होते.

दिल्लीच्या विज्ञान भवनात 23 डिसेंबरला बिग बी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.

परंतु बिग बींची प्रकृती स्थिर नसल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नव्हते. याबद्दलची माहिती स्वत: अमिताभ यांनी ट्विटद्वारे दिली होती.

प्रकृतीच्या कारणामुळे बिग बी उपस्थित न राहिल्यामुळे हा पुरस्कार 29 डिसेंबरला दिला जाणार असल्याची केंद्र सरकारने जाहीर केलं होतं.

काय म्हणाले अमिताभ ?

पुरस्कार मिळाल्यानंतर बिग बी यांनी मनोगत व्यक्त केले.

‘मला या पुरस्कारासाठी पात्र मानले, यासाठी मी भारत सरकारचा आभारी आहे’, या शब्दात अमिताभ बच्चन यांनी सरकारचे आभार मानले.

जेव्हा या पुरस्कराची घोषणा करण्यात आली, तेव्हा माझ्या मनात शंका आली. की मी खूप काम केलयं आता घरी बसून आराम करण्याची वेळ झालीय ? अशी शंका माझ्या मनात आली.

आता देखील थोडं काम बाकी आहे. जे मला पूर्ण करायचं आहे. असे अमिताभ बच्चन आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.

दादासाहेब पुरस्कार देण्याची सुरुवात भारत सरकारने 1969 सालापासून केली. सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येते.

रोख 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ पदक आणि एक शाल असे या पुरस्काराचे स्वरुप असते.

Exit mobile version