Sat. Dec 14th, 2019

भाषणावेळी सरकारवर टीका; अमोल पालेकरांचे भाषण थांबवले

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट येेथे सरकारवर टीका केल्याबद्दल भाषण करण्यास थांबवले. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मणार्थ आयोजीत केलेल्या एका प्रदर्शनात अमोल पालेकर भाषण करत होते. यावेळी आर्ट गॅलरींनी आपले स्वातंत्र गमवत असल्याचे बोलत असताना अमोल पालेकर यांना भाषण करण्यास थांबवण्यात आल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडला ?

ज्येष्ठ अभिनेते अमोस पालेकर कार्यक्रमात भाषण करत असताना त्यांना वारंवार रोखलं जातं होते. तसेच सरकारवर टीका केल्यानंतर त्यांना भाषण करण्यापासून थांबवण्यात आले.

आर्ट गॅलरींनी स्वत:चे स्वातंत्र गमवलंय. तसेच त्यांनी गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

यावेळी पालेकर यांनी सल्लागार समितीबाबात चर्चा केली. समितीत स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र समिती संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे त्यांनी म्हटलं. त्यांच्या अनेक परखड मतं मांडत असल्यामुळे त्यांना आयोजकांनी भाषण करताना रोखण्याचा प्रयत्न केला.

‘आयोजकांनी त्यांना तुम्ही हे बोलू शकत नाही’. कृपया बर्वेंबद्दलच बोला, असे सांगितले.

‘तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं, मला बोलण्यापासून रोखत आहात ? असा प्रश्न विचारत काही दिवसांपूर्वी असाच प्रकार नयनतारा सहगल यांच्यासोबत घडला असल्याचे त्यांना सांगितले. तुम्हाला नक्की काय हवयं’, असे पालेकरांनी आयोजकांना विचारले.

यामुळे आयोजकांनी त्वरीत भाषण संपवण्यास सांगितले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *