अभिनेता अंकुश चौधरी याची पोस्ट चर्चेत

अभिनेता अंकुश चौधरी याची सोशल मिसूयावरची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. अंकुश चौधरीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मेजीशीर पोस्ट शेअर केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमध्ये अंकुशने एक विनोदी पोस्ट शेअर केली आहे. ‘आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे….ती सध्या कुठे मिळते’, अशी पोस्ट अंकुशने शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अंकुशने त्याच्या हटके अंदाजात चाहत्यांना मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता अंकुशने आणखी एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
याआधी अंकुशने एक हटके पोस्ट शेअर केली होती. यात दुनियादारी सिनेमाच्या डॉयलॉगचा वापर केला होता. ‘तेरी मेरी यारी,अगोदर मास्क घालू, मग करू दुनियादारी’,असं म्हणत त्याने चाहत्यांना मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं
