Thu. May 6th, 2021

बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणाला कोरोनाची लागण

कोरोनामुळे देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाचा कहरच पाहायला मिळतोय. राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. देशपातळीवरही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाभोवतीच कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनासुद्धा गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाली. आता बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच आशुतोषने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. आशुतोषने स्वत: सोशल मीडियावर आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. एक हसरा फोटो शेअर करत, त्याने ही माहिती शेअर केली. या फोटोसोबत त्याने ‘आपले शरीर एका दुर्गासमान असते.यात नऊ द्वार असतात. याठिकाणी असलेली परमचेतना, रक्षण करणा-या शक्तीला दुर्गा म्हटले जाते. आज भारतीय नववर्षाची सुरूवात आहे. याला चैत्र नवरात्री असेही म्हटले जाते. आजपासून नऊ दिवस भारतात जगतजननी दुर्गेचे पूजन होते. या अत्यंत शुभदिनी तुम्हाला तुमच्या शरीरातील एका विकाराबद्दल माहिती मिळत असेल तर, यासारखे शुभ काहीही नाही. मला आजच कळले की, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी तात्काळ या आजारातून मुक्त होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केलेत. मी लवकरच बरा होईल, असा विश्वास व्यक्त करतो,’ असे आशुतोषने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
आशुतोष राणाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी राणा लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे.

6 एप्रिलला आशुतोषने पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. रेणुकाने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर याची माहिती दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *