Jaimaharashtra news

अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन

भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झालेले आणि नंतर अभिनय क्षेत्रात आलेले अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना झाल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बिक्रमजीत कंवरपाल हे सैन्यामध्येही कार्यरत होते. काही काळ सैन्यात घालवल्यानंतर त्यांनी तिथून निवृत्ती घेतली आणि ते अभिनयाकडे वळले. मर्डर २, कसम, हेट स्टोरी, पेज ३, आरक्षण अशा अनेक मालिका-चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. साहो, गाझी अटॅक, पाप, हिरोईन, कार्पोरेट अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले होते. आगामी भौकाल या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.

अभिनय करतानाच सैन्याचा गाढा अनुभव असल्यामुळे इतर अभिनेत्यांना अभिनयासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीही कंवरपाल यांना पाचारण करण्यात येत असे.

 

Exit mobile version