Fri. Jun 21st, 2019

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन

0Shares

ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. कॅनडातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कादर खान यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कादर खान यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक सिनेमांसाठी संवादलेखनदेखील केलं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणारा एक उत्तम अभिनेता म्हणून कादर खान यांना ओळखलं जायचं.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: