
अभिनेत्री सारा अली खानने काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
मात्र या गोष्टीला काही महिने उलटले पण कार्तिक काही साराला घेऊन डेटवर गेला नाही.
विशेष म्हणजे जोपर्यंत साराचे वडील सैफ अली खानने ठेवलेली अट पूर्ण करत नाही तोपर्यंत साराला डेटवर नेणार नाही असा निर्णय कार्तिकने घेतला आहे.
ज्या मुलाची आर्थिक बाजू भक्कम असेल आणि बँक खात्यात पुरेसे पैसे असतील त्याने साराला डेटवर न्यावे अशी अट सैफनं ठेवली होती.
या अटीचा विचार करून आपण आतापर्यंत थांबलो आहे असे कार्तिक मिश्किलपणे म्हणाला.
‘Koffee with Karan’ कार्यक्रमात करणने साराला डेटवर कधी नेणार असा प्रश्न कार्तिकला विचारला होता.
त्यावर ‘सैफच्या अटीप्रमाणे तयारीला लागलो आहे, जोपर्यंत बँक खात्यात मोठी रक्कम जमा होत नाही तोपर्यंत साराला डेटवर नेणार नाही’ असं कार्तिक आर्यन म्हणाला आहे.
.@TheAaryanKartik has his priorities straight. #KoffeeWithKaran #KoffeeWithKartik #KoffeeWithKriti #KartikAaryan #SaraAliKhan pic.twitter.com/KqK89ZGEc3
— Star World (@StarWorldIndia) February 10, 2019
एकीकडे सारा आणि कार्तिकचे सूत जुळवण्याचा प्रयत्न करणने केला असला तरी दुसरीकडे कार्तिक अनन्या पांड्येला डेट करत असल्याच्या चर्चाही आहेत.
मात्र आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असे सांगत कार्तिकनं अनन्यासोबतच्या लिंकअपच्या चर्चा उडवून लावल्या.