90च्या दशकातील या अभिनेत्याचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

90 च्या दशकातील अभिनेते महेश आनंद यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आलाय. ते 57 वर्षांचे होते. बॉलिवूडमध्ये 80 आणि 90 च्या दशकांतील अनेक सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या होत्या.

महेश आनंदच्या मृत्यूचं गूढ

महेश आनंद यांचा वर्सोवा येथील आपल्या घरी एकटेच राहत होते.

2002 सालापासून ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते.

आज त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

रविवारी या मृतदेहाचं Post-Mortem होणार आहे.

त्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

90च्या दशकात महेश आनंद यांच्या अनेक भूमिका लोकांच्या लक्षात आहेत.

अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सनी देओल, गोविंदा या अभिनेत्यांसह अनेक सिनेमांत त्यांनी लहानमोठ्या भूमिका केल्या होत्या.

आपल्या पीळदार देहयष्टीमुळे अनेक देमारपटांत त्यांना भूमिका मिळाल्या.

विशेष करू खलनायकाचा भाऊ, मुलगा किंवा मित्र अशा प्रकारच्या भूमिकांमध्ये आपण त्यांना पाहिलं आहे.

‘विश्वात्मा’, ‘खुद्दार’, ‘स्वर्ग’, ‘गुमराह’, ‘मजबूर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय.

मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सिनेमांमधून दिसेनासे झाले होते.

गोविंदा यांच्या ‘रंगीला राजा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमामधून त्यांनी अनेक वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक केलं होतं.

दारूच्या नशेत पोलिसांना शिव्या दिल्याप्रकरणी त्यांना वर्सोवा पोलिसांनी पकडलं होतं.

त्यांना आर्थिक चणचण असल्याचं सांगण्यात येत आहे.

पत्नीपासून विभक्त होऊन ते एकटेच राहत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी कुणालाही समजली नाही.

Exit mobile version