Thu. Dec 12th, 2019

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खा. डॉ. अमोल कोल्हे संसदेत आक्रमक!

शिरूरचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे संसदेत अर्थसंकल्पादरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. शेतकऱ्यांना 6000 रुपये अनुदान म्हणजे दिवसाला जेमतेम 17 रुपये मिळणार, ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे असं कोल्हे यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांचा सन्मान की चेष्टा?

शेतमजुरांना वार्षिक 6 हजार अनुदानाचा निर्णय महिन्याला 500 रुपये मिळणार.

याचाच अर्थ दिवसाला 17 रुपये मिळणार

एवढ्या तुटपुज्या रकक्मेत घर चालवणं शक्यच नाही.

वार्षिक 6000 रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांचा सन्मान आहे की चेष्टा?

असा सवाल कोल्हे यांनी लोकसभेत विचारला.

काय आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती?

अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील शेतमजुरांची परिस्थिती सभागृहाला कथन केली.

महिला मजुरांना दिवसाला 200 ते 300 रुपये मिळतात

पुरूष मजुराला दिवसाला 500 रुपये मजुरी दिली जाते.

त्यामुळे पंतप्रधानांची वार्षिक 6000 रुपये मदतीची योजना अजिबात उपयोगाची नाही.

देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचं स्वप्न पाहत असताना 2015 ते 2018 दरम्यान महाराष्ट्रात 12,021 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे याकडे लक्ष द्या असं कोल्हे म्हणाले.

गावात जाऊन 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेबद्दल सांगून लहान मुलाला मिठाई दिली, तर तो विचारेल ‘माझा बाप मला परत आणून द्या.’

असं डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *