Jaimaharashtra news

अभिनेता नागार्जुनकडून पी व्ही सिंधूला BMW X5 भेट!

दक्षिण भारतातील स्टार्स हे नेहमीच आपल्या औदार्यासाठी चर्चेत असतात. फॅन्सच्या मागण्या पूर्ण करणं, कधी सरकारला सवाल करणं यांसारख्या अनेक गोष्टींमुळे South Indian actors लोकांना आपलेसे वाटतात. Telugu cinema मधील मोठं नाव असणारे अभिनेते आणि निर्माते नागार्जुन यांनी नुकत्याच केलेल्या एका गोष्टमुळे चाहते त्यांच्यावर फिदा झालेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून अवघ्या भारताची मान उंचावणाऱ्या बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिच्या पाठीवर नागार्जुन यांनी कौतुकाची थाप दिली आहे. मात्र नुसतंच Twitter वर अभिनंदन करून नव्हे, किंवा केवळ पुष्पगुच्छ पाठवूनही नव्हे. तर नागार्जुन यांनी P. V. Sindhu हिला महागडी BMW X5 कार भेट दिली आहे.

तेलुगू अभिनेते Nagarjuna यांचा हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओ आहे. याच स्टुडिओमध्ये बॅडमिंटनपटू PV Sindhu हिला नागार्जुन यांनी आमंत्रित केलं. यावेळी तिच्यासोबत तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद उपस्थित होते.

BMW ची कार म्हणजे अर्थातच साधंसुधं प्रकरण नाही. या BMW X5 कारची किंमत 80 लाखाच्या घरात आहे. ही कार नुकतीच  भारतात लाँच झाली आहे.

ही बीएमडब्ल्यू कार नवीन CLAR प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

कारचा व्हीलबेसही 42 मिमीने वाढवून चक्क 2975 मिमी केलाय.

नवीन BMW X5 मध्ये 3.0 लिटर टर्बो डिझेल इंजिन दिले गेले आहे.

6.5 सेकंदात ही बीएमडब्ल्यू कार 0 ते 100 किलोमीटर वेग पकडते.

या नवीन बीएमडब्ल्यू एक्स 5 मध्ये ब्रेक असिस्ट, एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकींग सिस्टम, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, डायनामिक ट्रॅक्शन कंट्रोल. अटेंडंस असिस्टंट, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इलेक्टॉनिक व्हेइक एम्बोबिलायझर, ऑटो पार्किंगसह इलेक्ट्रिक पार्किंग अशा प्रकारची वैशिष्ट्यं आहेत.

 

Exit mobile version