‘ट्रम्पसाठी १२० कोटी आणि कोरोनासाठी फक्त टाळ्या आणि थाळ्या’, ‘या’ अभिनेत्रीची टीका

देशभरात कोरोना व्हायरसची दहशत असताना सरकारने २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. तसंच या दिवशी संध्याकाळी ५ वाजता अशा धोक्याच्या काळातही आपलं कर्तव्य बजावणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या तसंच थाळ्या वाजवण्याचंही आवाहन केलं होतं. त्याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र अभिनेत्री नगमा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला होता. त्याचाच आधार घेत अभिने६ नगमा हिने मोदींवर हल्लाबोल केला आहे. नगमा हिने एक Tweet करून पंतप्रधानांना सवाल केला आहे. ट्रम्प यांच्यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करणारे पंतप्रधान यांनी कोरोनापासून रक्षण करण्यासाठी फक्त टाळ्या आणि थाळ्याच, अशा आशयाचं ट्विट नगमा हिने केलं आहे.
तिचं हे Tweet सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. या ट्विटवर अनेकांनी टीका केली तर अनेकांनी प्रतिसाद देत कौतुकही केलं. नगमा यापूर्वी काँग्रेसची नेत्री राहिली आहे. यावेळी तिने मोदींवर निशाणा साधल्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.