Sat. Sep 21st, 2019

प्रवीण तरडे यांच्या कारचा सासवडनजीक अपघात, तरडे सुखरूप

0Shares

“आरारारारा… खतरनाक” या आरोळीमुळे लोकप्रिय झालेले लेखक,दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या कारचा 27 ऑगस्ट रोजी रात्री अपघात झाला. रात्री 11 च्या सुमारात सासवडजवळील हिवरे गाव परिसरात त्यांच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने ते अपघातातून बचावले आहे.

प्रवीण तरडे यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे हे देखील होते.

अपघाताची माहिती मिळाताच सासवड पोलीस घटनास्थळी पोहोचले.

तरडे अपघातातून सुखरूप बचावले आहेत, तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं पोलिसांतर्फे सांगण्यात येतंय.

‘मुळशी पॅटर्न’ सिनेमानंतर प्रवीण तरडे शिवचरित्रावर आधारित पुढील चित्रपट करत आहेत.

27 ऑगस्टचा मंगळवार हा मराठी कलाकारांसाठी अपघातवार ठरलाय. प्रवीण तरडे यांच्या आधी गायक आनंद शिंदे यांचाही इंदापूरजवळ अपघात झाला. त्यांच्या पायाला दुखापत झाली. 27 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा आपघात झाला होता.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *