झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन

नवदच्या दशकात ‘ओम फट् स्वाहा’ या मंत्राचा दरारा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचं निधन आज झालं असून त्यांनी झपाटलेला चित्रपटात ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका साकारली होती. शिवाय अभिनेते राघवेंद्र कडकोळ त्यांनी वयाच्या ८३ वर्षी हे जग सोडलं. पुण्यात त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
राघवेंद्र यांनी बरेच मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी अश्रूंची झाली फुले नाटकात धर्माप्पा ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. त्यांनी ‘गौरी’,‘ब्लक अँड व्हाईट’ ‘सखी’, ‘कुठे शोधू मी तिला’या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर ‘छोडो कल की बात’या हिंदी चित्रपटातमध्ये सुद्धा काम केलं होतं. बालगंधर्व परिवारतर्फे राघवेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राघवेंद्र यांनी अनेक दिग्गज कलावंतांसोबत काम केले. ‘झपाटलेला’ या चित्रपटातील त्यांची बाबा चमत्कार ही भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.