Thu. May 6th, 2021

एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या रियाला युझर्सनी केलं ट्रोल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रियाला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केल्यानंतर तिचा एक व्हिडिओ इन्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यानी तिला पुन्हा एकदा सुनवलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर रियाला सुशांतच्या चाहत्यानी धारेवर धरले होते. सुशांतच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीला दोषी ठरवण्यात आलं असून रियाला सोशल मीडियावर वारंवार ट्रोल केलकेल्या जात आहे. सध्या रिया स्वतःचं आयुष्य नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काहीजण तिला सुनावण्यामध्ये कोणतीच कसर सोडत नाही.

सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर रिया चक्रवर्चीचा हा एअरपोर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिया ही एअरपोर्टवर एंट्री घेत आहे. रियानं यावेळी कोविडच्या नियमांचं पालन करताना मास्क आणि फेस शिल्डचा वापर केलेला दिसत आहे. यावेळी देखील फोटोग्राफर्स हे रियाला सतत फॉलो करत होते. मात्र रिया त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे होती. जेव्हा रिया प्रवेशद्वाराजवळ पोहोचली तेव्हाच थांबली आणि कॅमेराकडे पाहून इथे तर थांबवंच लागतं असं बोलताना दिसली. पण यावरून आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

काही नेटकऱ्यानी लिहिलं, जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हिला शहर सोडून जाण्याची परवानगी नाही. तर आणखी एका नेटकऱ्यानी लिहिलं, ‘ही तर अगदी आरामात फिरत आहे. जसं काही घडलंच नाही. अपराधी नेहमीच बाहेर फिरत राहतील आणि निरपराध मरत राहतील.’ या नेटकऱ्यानी केवळ रियालाच ट्रोल केलं नाही तर त्यांनी विरल भयानी यांनाही खूप सुनावलं आहे. त्यांनी रियाचे कोणतेही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर न करण्याची विनंती केली आहे. रिया लवकरच ‘चेहरे’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, अन्नू कपूर, रघुबीर यादव यांच्याही भूमिका आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे रूमी जाफरी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *