अभिनेता सलमान खानचा ग्रीन इंडिया उपक्रमात सहभाग

बॉलीवडूमधील भाईजान, सुपरस्टार सलमान खान हा सध्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी हैदराबाद येथे आहे. हैदराबादेतील प्रसिद्ध रामोजी फिल्मसिटी येथे सलमानच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. चित्रिकरणादरम्यान, सलमान खानने ग्रीन इंडिया उपक्रमात सहभाग घेतला असून वृक्षारोपण करत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले आहे. यावेळी खासदार आणि ग्रीन इंडियाचे संस्थापक जे.संतोष कुमार, सहसंस्थापक राघव, करुणाकर रेड्डी उपस्थित होते.
अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रिपटाचे चित्रिकरण रामोजी फिल्मसिटी येथे सुरू आहे. यावेळी सलमानने राज्यसभेचे खासदार आणि ग्रीन इंडियाचे संस्थापक जे. संतोष कुमार यांची भेट घेत ग्रीन इंडिया उपक्रम ५.० मध्ये सहभाग घेतला. यावेळी सलमान खानने त्याच्या सहकाऱ्यांसोबत रामोजी फिल्मसिटीमध्ये वृषारोपण केले. तसेच वनस्पती प्रत्येक व्यत्कीला ऑक्सिजन पुरवते असे वक्तव्य सलमानने केले.
दरम्यान, वृक्षारोपणाचे काम हाती घेतल्याप्रकरणी सलमान खानने खासदार संतोष कुमार यांचे आभार मानले आहेत. भारतातील हरितक्रांती सुधारण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करत आहात. यामुळे पृथ्वीवरील सजिवांचे, भावी पिढ्यांचे रक्षण करण्यास मदत होणार आहे. तसेच सलमानने चाहत्यांना आणि अनुयायांना ग्रीन इंडिया प्रकल्पात सामील होऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे.
खासदार संतोष कुमार यांनी ग्रीन इंडिया प्रकल्पात सामील झाल्याबद्दल अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्याने रोपे लावण्याचा उपक्रम त्याच्या चाहत्यांना नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल, असे संतोष कुमार म्हणाले.