Sun. Jun 16th, 2019

मराठी सिनेसृष्टीतील ‘हा’ चॉकलेट बॉय लवकरच विवाहबंधनात अडकणार

0Shares

मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता सिद्धार्थ चांदेकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

नुकताच सिद्धार्थ आणि मिताली मयेकर यांचा मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला आहे.

सिद्धार्थने साखरपुड्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आयुष्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

‘उर्फी’ सिनेमातून मितालीने सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले आहे.

तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ सारखे अनेक चित्रपट ‘अग्नीहोत्र’, ‘प्रेम हे’ सारख्या मालिकेतून सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. त्यावेळीही सिद्धार्थने मितालीसोबतचा फोटो शेअर करत तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला असे म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्याने ओळख करून दिली होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *