Wed. Jun 19th, 2019

हिंदीच्या सक्तीवर ‘रंग दे बसंती’ स्टार सिद्धार्थचे Tweet!

0Shares

हिंदी भाषेच्या सक्तीला तामिळनाडूतून झालेल्या प्रखर विरोधामुळे अखेर केंद्र सरकारने माघार घेतली  हिंदीभाषिक नसलेल्या राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती केंद्र सरकारने केली होती. मात्र  सरकारने ही सक्ती मागे घेतली असली तरी सोशल मीडियावर हा अजूनही एक चर्चेचा मुद्दा आहे.

अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींचाही हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध असून ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ यानेही सोशल मीडियावर एका नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे.

हिंदी भाषेच्या सक्तीवरून सडेतोड उत्तर दिले .

हिंदी भाषिक अन्य भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे सिद्ध करणारी आकडेवारी कुठे आहे?

अनेक भाषांपासून हिंदीची निर्मिती झाली आहे, असं ट्विट एका नेटकऱ्याने केलं.

काय म्हणाला सिद्धार्थ?


एका तमिळ स्थानिकाने हिंदी शिकणं आणि सक्तीने हिंदी भाषा शिकून त्यात परीक्षा द्यायला लावणं यात खूप मोठा फरक आहे.

मी स्वत: 5 वेगवेगळ्या भाषा बोलतो

10 भाषा मला समजतात.

मला कधीच त्या भाषा शिकण्यासाठी सक्ती केली गेली नव्हती आणि हे असंच असलं पाहिजे.

भारतात विविध भाषा बोलल्या जातात आणि भाषेची सक्ती करू नये.

काय आहे प्रकरण?

संपूर्ण देशात आठवीपर्यंत हिंदी हा विषयाची अनिवार्य करण्याच्या शासन निर्णयावर सध्या बिगर हिंदी राज्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.

तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत हिंदी अनिवार्य नाही.

तामिळनाडूमधील शाळां हिंदीच्या सक्तीला प्रचंड विरोध होत आहे. या विरोधामुळे अखेर केंद्र सरकारने माघार घेतली आहे आणि हा विषय ऐच्छिक ठेवला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: