Mon. Dec 6th, 2021

‘मृतदेहांवर अंतिमसंस्कार मोफत करावे’

अभिनेता  सोनू सुद याने राज्य सरकारकडे मृतदेहांवर अंतिमसंस्कार मोफत करण्याची मागणी केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

‘रूग्णाच्या लढाईची सुरूवात होते, त्याच्या घरापासून. मग तो गरीब असो किंवा मध्यमवर्गीय. घरातून ऑक्सिजनसाठी, त्यानंतर बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर या लढाईत काही लोक शेवटच्या टप्प्यावर पोहोचतात. आयुष्याचा शेवटचा टप्पा म्हणजे स्मशानभूमी’. असं सोनू सूद म्हणाला.

‘आम्ही मदत करत आहोत, पण आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो, की लवकरच असा कायदा तयार करा, ज्यामुळे अंतिमसंस्कार मोफत होऊ शकेल’, असंदेखील सोनू सूद यावेळी म्हणाला.

‘दिवसाला अंतिमसंस्कारासाठी जवळपास 6 ते 7 कोटी रूपयांचा खर्च येतो. जर हा खर्च सरकारने स्वतःच्या खांद्यावर  घेतला तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा नातेवाईकांची मदत होईल. त्यामुळे यावर विचार करून निर्णय घ्या’ अशी मागणी सोनू सुदने सरकारकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *