Fri. Jun 5th, 2020

अभिनेते सैयद बद्र उल हसन यांचे निधन

बॉलिवूडमध्ये ‘पप्पू पॉलिस्टर’च्या नावाने ओळखले जाणारे विनोदवीर अभिनेते सैयद बद्र उल हसन यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे.

ते गेल्या 5 दिवसांपासून अंधेरीतील रुग्णालयात उपचार घेत होते.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

‘ओम नम: शिवाय’मालिकेतील नंदी असो किंवा ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ मालिकेतील मैसूरच्या महाराजांची भूमिका, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिले.

‘जोधा-अकबर’, ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’ या सिनेमांमधील त्यांच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या.

सैयद बद्र उल हसन हे गेली 25 वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. अनेक मालिका, सिनेमे, जाहिरांतीमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे छाप सोडली आहे.

सैयद बद्र उल हसन हे अभिनयाव्यतिरिक्त शास्त्रीय नर्तकही होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *