अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश
उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढवणार…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढली आहे. उत्तर मुंबईमधून लोकसभा मतदारसंघात एक नवा चेहरा मिळाल्यानं शिवसेना आगामी निवडणुकीमध्ये फायदा होईल. उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने शिवसेनेला मोठी मदत मिळेल असं शिवसेनामधील नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी हाती बांधलेलं शिवबंधन शिवसेनेची ताकद वाढवणारं आहे. उर्मिला मातोंडकर या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून दाखल झाल्या होत्या. काँग्रेसच्या उमेदवार असताना उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन जल्लोषात प्रचार केला होता मात्र त्यांना यश संपादित झालं नाही.
मोदी लाट असतानाही त्यांना २ लाख ४० हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती. भाजपचे गोपाल शेट्टी या मतदारसंघातून लाखोंच्या फरकाने जिंकून येतात. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ४ लाखांच्या फरकाने विजय मिळवला. गोपाल शेट्टी यांचा हा विजय मोठा असला तरी काँग्रेसला उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे मिळालेली मते देखील अत्यंत महत्त्वाची ठरतात.