Wed. Oct 16th, 2019

खड्ड्यांमुळे कलाकारही संतापले; फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली भावना

पावसाळ्यात मुंबईकरांना भेडसावणारी समस्या म्हणजे खड्डे. पावसाळ्यात मुंबईकरांना प्रचंड खड्ड्यांना सामोरे जात असताना वाहतूक कोंडीचाही त्रास होतो. मुंबईत वाहतूक कोंडी असतानाच खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने मुंबईकर नाराज झाला आहे. त्याचबरोबर अभिनेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. यामध्ये काही मराठी कलाकारांनीही टीका केली आहे.
हे जग एक खूप मोठा खड्डा असून तो भरण्यासाठी जो टॅक्स भरावा लागेल त्यासाठी माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल असे जीतेंद्र जोशीने खोचक टीका केली आहे.

जीतेंद्र जोशीने फेसबूकवर खड्ड्यांचे फोटोही शेअर केले आहे.
तर दुसरीकडे सुबोध भावेने खड्ड्यात पडून भावाचा मृत्यू झाल्याचे दु:ख व्यक्त केले आहे.

प्रशांत दामले यांनी कल्याणच्या खड्ड्यांवर टीका केली.

त्यामुळे आता इतक्या टीकेनंतरही महापालिका या खड्ड्यांकडे लक्ष देईल का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *