Fri. Oct 7th, 2022

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. २१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर खंडणी वसुल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी  संचालनालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचं म्हटलं आहे.

सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली होती. सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणीने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. सुकेशने पिंकीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.

सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने त्याच्या फोनला प्रतिसाद दिला नाही, असेही ईडीच्या चार्टशीटने उघड केले. दरम्यान, अभिनेत्रीने आरोप केला आहे की सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिला संपर्क केला आणि तिला सुकेशशी संपर्क करायला सांगितला, ज्याला जॅकलीन शेखर रत्न वेला नावाने ओळखत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.