Thu. May 6th, 2021

बॉलिवूड क्वीनला नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत आता तिच्या एका चुकीमुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.कंगनाने तिच्या ट्विटर अकांउटवर अष्टमी निमित्त हा प्रसाद थाळीचा फोटो शेअर केला होता. मात्र कंगनाने या प्रसादाच्या थाळीत कांद्याच्या काही फोडी ठेवल्याने नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

मात्र पहिल्यांदा कंगनाने यावर शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर भारतात गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवरात्र सुरू झाली आहे, तर आज अष्टमी आहे. आणि त्याच निमित्तीने विशिष्ट प्रसाद केला जातो. पण कंगनाने या प्रसादाच्या थाळीत कांद्याच्या काही फोडी ठेवल्याने नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. काहींनी लिहिलं प्रसादाच्या थाळीत कांदा? तर काहीजण म्हणाले हिंदूंमध्ये आणि विशेषत: नवरात्रीत कांदा, लसून पूर्णपणे वर्ज्य असते. तर एकाने लिहिलं हिंदू कधीपासून नवरात्रीत कांदा खाऊ लागले? अशा प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. तर इतकंच नव्हे #onion हा नवा ट्रेंड देखील सुरू झाला.

त्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा ट्वीट करत यावर स्पष्टीकरण दिलं. “मला विश्वास होत नाही #onion हा टॉप ट्रेंड आहे. हे कोणालाही दुखावण्यासाठी नाही पण ही हिंदू धर्माची सुंदरता आहे. की तो इतर धर्मांप्रमाणे कठोर नाही, ते खराब नको करूयात. माझा आज उपवास आहे, पण माझ्या कुटुंबाला जर यासोबत सलाड खायचं असेल तर त्यांना खाऊ दे “, असं कंगना म्हणाली. कंगनाच्या या ट्विटनेही नेटकऱ्यांनी तिला चांगलं सुनावलं आहे. काहींनी लिहिलं आता काहीही स्पष्टीकरण देऊ नकोस , तर एकाने कांदा न खाण्याचे फायदे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *