Fri. Sep 17th, 2021

Blog : फक्त अभिनेत्री नव्हे, मी आहे योद्धा…

मला एक अभिनेत्री म्हणून लोक ओळखतात. ‘अंबट गोड’, ‘तुझं माझं ब्रेक-अप’ सारख्या मालिकांमधून मी घराघरात पोहचली. लोक मला ओळखू लागले. पण माझी ओळख ही तेवढीच नाही. लहानपणापासून मी एका  मेंदूशी निगडीत व्यंगाशी लढा देतेय. त्या Neurological order शी केवळ सामनाच करत नाहीय, तर त्यासंदर्भात लोकांमध्ये जागृती करतेय. मी ज्या समस्यांशी झगडतेय, त्या समस्यांशी तुमच्यातीलही अनेक जण लढत असतील. काहीजण त्याबद्दल जाहीरपणे बोलत नसतील, आतल्या आत कुढत असतील. आपल्यातल्या या समस्येबद्दल लोकांशी जाहीरपणे बोलणं अनेकांना जमत नसेल. तर त्यांनी आता या कोंडमाऱ्यातून बाहेर येण्याची गरज आहे. त्यांच्याबरोबर कुणी असो ना असो, मी आहे… कारण मी अभिनेत्री असले, टीव्ही स्टार असले, तरी मी ही झगडतेच आहे Epilepsy शी…

Epilepsy म्हणजे काय रे भाऊ?

Epilepsy हा शब्द कदाचित तुम्हाला जड वाटेल. त्याला अपस्मार म्हटलं जातं.

साध्या सोप्या मराठीमध्ये त्याला मिर्गी येणं, आकडी येणं किंवा फिट्स येणं असं बरंच काही काही म्हटलं जातं.

या मिर्गीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात.

त्याबद्दल मी लोकांशी याबद्दल बोलते.

खरंतर मिर्गी हे असं व्यंग आहे, की याबद्दल जास्त बोलायला लागलं, तरी अकडी येऊन शुद्ध हरपून जाते. तरीही मी याबद्दल बोलते.

कारण हे गैरसमज दूर करणं ही मला माझी जबाबदारी वाटते.

लोक अशिक्षित असो वा सुशिक्षित, ते अजूनही अपस्मार या प्रकाराबद्दल चुकीचे भ्रम बाळगून असल्याचं मला दिसलंय.

मिर्गी येणाऱ्याला कांदा हुंगवणं, चपलेचा वास देणं, काहीवेळा तर चपलेने मारणं असे प्रकार केले जातात.

अशा अंधश्रद्धा आपल्याच देशात चालतात, असं नव्हे. तर परदेशातही अपस्माराबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत.

परदेशात मिर्गीचा झटका येणाऱ्या माणसाच्याजवळ एखादी लोखंडी वस्तू ठेवून देण्याची पद्धत आहे.

प्रत्यक्षात अशा गोष्टींना काही शास्त्रशुद्ध आधार नाही.

मी दर गुरुवारी माझ्या युट्युब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करून यासंदर्भात जागृतीचं काम करते.

मी दर महिन्याला मिर्गीबद्दलच्या काही ना काही themes ठरवते.

त्या theme वर मी महिनाभर दर गुरुवारी एक व्हिडिओ करते.

एखाद्या महिन्यात मिर्गीबद्दलचे भ्रम दूर करण्यासाठी मी व्हिडिओ युट्युब चॅनलवर अपलोड केले आहेत.

तसंच जर तुम्ही एकटे असाल, आणि फिट्स आल्या तर स्वतःची काळजी कशी घ्याल, या विषयावर मी लोकांमध्ये जागृती निर्माण करतेय.

 

Epilepsy ला disorder घोषित करावं यासाठी माझा लढा

Epilepsy ला जगाच्या पाठीवर कुठेही disorder घोषित केलेलं नाही. ते खरंतर करायला हवं. त्याची सुरुवात आपल्याच राज्यापासून, आपल्याच देशापासून झाली तर ते ऐतिहासिक ठरेल. मी यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याचे अनेक फायदे होतील. या विषयावर research साठी आणखी निधी मिळेल. विद्यार्थ्यांनाही फायदा होईल. कारण जरी हात fracture असला, तरी ते handicapped असल्याचं certificate दाखवून 3 तासांच्या पेपरला साडे 3 तास बसू शकतात. मिर्गीचा त्रास असणाऱ्यांना मात्र अजूनही ती सुविधा नाही. मिर्गीचे झटके येणाऱ्या ADHD चा त्रास असतो. Anti- Epileptic औषधांमुळे होणारे side effects हा देखील विचारात घेण्याचा मुद्दा आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर depression येतं. Memory loss हा एक त्यातून निर्माण होणारा problem असतो. नावं लक्षात न राहणं, जागेची नावं विसरणं हे त्यातून निर्माण होणारे problems आहेत.

मी यावर इतकं का बोलते?

अनेकजणांना epilepsy चा त्रास असतो. लहान मुलांना, वयात येणाऱ्या मुलांना तर यामुळे खूपच त्रास होतो. त्यातूनच anti-epileptic औषधांमुळे त्य़ांची अवस्था खूपच बिकट होते. त्यांना येणारं नैराश्य, बुजरेपण, एकटेपणाचा त्रास, लोकांशी बोलताना वाटणारी भीती या सर्वांमुळे त्यांचे आई-वडीलही हैराण असतात.

मी त्या वयाची असताना मला कुणी मार्गदर्शन करायला नव्हतं. मी स्वतःच या सर्व गोष्टींशी लढा देत इथवर पोहोचलीय. पण अशा teenager ना मार्गदर्शन करायला, त्यांची मैत्रीण बनून त्यांना सल्ले द्यायला, त्यांच्यावर येणारा ताण घालावायला मला आवडतं. ज्या अडचणींमधून मी गेले आहे, तो त्रास या मुलांना व्हायला नको असं मला वाटतं.

तुम्ही एकटे नाही आहात. हा त्रास होणारे तुम्हीच नाहीत. तुम्ही वेगळे नाहीत, ही जाणीव करून देणं आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं यासाठी माझे सगळे प्रयत्न सुरू असतात. मी मला असणारा epilepsy चा problem मी कधीच लपवून ठेवलं नव्हतं. त्यामुळेच मी इतरांनाही या भीतीतून बाहेर काढायला प्रयत्न करत असते. यासाठी मी निधी उभारते. अभिनयातून जे कमावते, ते मिर्गीबद्दलच्या जागरूकता मोहिमेवर खर्च करते.

हेच मी www.jaimaharashtranews.com च्या माध्यमातून तुमच्यापाशी व्यक्त करतेय. तुम्हालाही असा problem असेल, तर घाबरू नका. Open up व्हा. तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता.

माझे व्हिडिओ पाहून शकता. मला मेसेज करू शकता.

या मोहिमेत मला साथ देऊन मिर्गीच्या समस्येशी लढू शकता. Support करू शकता. मग, मला साथ देणार ना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *