Wed. Aug 4th, 2021

ग्लॅमरस अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँचा तुर्कस्तानात हिंदू पद्धतीने विवाह!

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघाची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ ही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. कोलकाता येथील उद्योगपती निखिल जैन याच्याशी तुर्कस्तानातील बोडरम शहरात नुसरत जहाँ हिने हिंदू रीतीरिवाजानुसार विवाह केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ हिने भाजप उमेदवाराचा साडे 3 लाख मतांनी पराभव केला होता.

 

सिनेसृष्टीत यश मिळवल्यानंतर राजकारणाच्या क्षेत्रात उतरलेल्या नुसरत जहाँने आपल्या वैयक्तिक आयुष्यातही नव्या जगात प्रवेश करत आहे.

Turkey येथे हिंदू पद्धतीने विवाह केल्यावर त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


या फोटोला caption देताना तिने ‘Towards a happily ever after with Nikhil Jain’ असं लिहिलं आहे.

हा विवाहसोहळा Sixth Sense Kapalankaya  या हॉटेलमध्ये पार पडला.

या विवाहाला नुसरत जहाँ आणि निखिल जैनचे कुटुंबिय तसेच आप्त मित्र कुटुंबातील मंडळी आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

या विवाहसोहळ्यामुळे नुसरत खासदारकीच्या शपथविधीसाठी उपस्थित राहू शकली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *