Jaimaharashtra news

अभिनेत्री नाइरा शाहला बर्थ डे पार्टी पडली महागात

बॉलिवूड अभिनेत्रीला ड्रग्ससोबत बर्थ डे सेलिब्रेशन महागात पडले. अभिनेत्री नाइरा शाह पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर करत होता. ही पार्टी ऐन रंगात येत असतानाच पोलिसांना याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेलवर छापा मारला आणि पोलिसांनी अभिनेत्रीसह तिच्या मित्र परिवाराला अटक केली. सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री मुंबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये छोटी भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि तिच्यासोबत ड्रग्सचं सेवन करणाऱ्यांना अटक करण्यात आले आहे.

मात्र वांद्रेच्या कोर्टाकडून तिला जामीन मिळाल्यानंतर अभिनेत्रीला सोडण्यात आले. नाइराची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असल्याचे पोलिस अधिकारयांनी सांगितले आहे आणि जर अहवालात निर्धारित प्रमाणपेक्षा नायराच्या शरीरात अधिक ड्रग्स आढळे तर तिचा त्रास वाढू शकतो हे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version