Thu. May 6th, 2021

#MeToo नवाजुद्दीन सिद्दीकीवर ‘या’ अभिनेत्रीने केला गंभीर आरोप

बॉलिवूडमध्ये सुरु असलेली #MeToo मोहिम दिवसेंदिवस पेट घेत आहे. या मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक अनेकजणांवर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र आता या मोहिमेअंतर्गत मॉडेल आणि अभिनेत्री निहारिका सिंह हिने नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. निहारीकाने एका महिला पत्रकाराकडे आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबतचे कथन केले आहे. माजी मिस इंडिया असलेली निहारिका सिंह हीने आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत सविस्तर लिहीले आहे. निहारिकाने महिला पत्रकाराकडे दिलेल्या माहितीत नवाजुद्दीन सिद्दीकीसह भूषण कुमार, साजिद खान यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.

‘मिस लवली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नवाजुद्दीनसोबत भेट झाली होती. नवाजुद्दीनबद्दल तिने सांगितले की एकदा नवाज रात्रभर शूटींग करत होता. त्यानंतर सकाळी मेसेज करुन त्याने मी तुझ्या घराजवळ असल्याचे सांगितले. मी त्याला नाश्ता करण्यासाठी घरी बोलावले. त्यानंतर जेव्हा मी घराचा दरवाजा उघडला तेव्हा नवाजने मला बळजबरी मिठी मारली. मी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमच्यात धक्काबुक्की झाली, नंतर काही वेळाने मी त्याच्या मिठीतून सुटले. नवाजसोबत संबंध ठेवण्याची माझी इच्छा नव्हती असंही निहारिकाने म्हटलं आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Sandhya Menon

@TheRestlessQuil

2005 Miss India Niharika Singh’s experiences in Bollywood but especially with Nawazuddin Siddiqui and Mayank Singh Singvi

Niharika and other women accused Siddiqui of making up lies in his autobiography, due to which he withdrew the book.

This is her side of the story.

803 people are talking about this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *