Tue. Jan 18th, 2022

‘बाहुबली’ तील ‘शिवगामी देवी’ आता पॉर्न स्टारच्या भूमिकेत !

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ सिनेमात बाहुबलीची आई ‘शिवगामी देवी’ हिची भूमिकाही लोकप्रिय ठरली होती. ‘मेरा वचन ही है शासन’ अशी दमदार डायलॉग म्हणणारी शिवगामी देवी प्रेक्षकांना खूप आवडली. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘रम्या कृष्णन’  आपल्या आगामी तामिळ सिनेमात जी भूमिका साकारणार आहे, त्याबद्दल वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

‘सुपर डीलक्स’ या आगामी तामिळ सिनेमात रम्या कृष्णन एका पॉर्न स्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील एक सीन करण्यासाठी मला 2 दिवस लागले असल्याचंही तिने एका मुलाखतीत सांगितलं.

काय म्हणाली रम्या कृष्णन?

रम्या कृष्णन ही 80 आणि 90 च्या दशकात आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध होती.

तामिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेांमध्येही तिने काही हॉट भूमिका केल्या होत्या.

मात्र ‘बाहुबली’ मध्ये शिवगामीची भूमिका साकारल्यावर देशभरात ती एक कठोर आई म्हणून लोकप्रिय झाली.

त्यामुळे ती आता नव्या सिनेमात कशा प्रकारची भूमिका साकारणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

मात्र रम्याने चक्क एका पॉर्न स्टारची भूमिका स्वीकारल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

चित्रपटातील पॉर्न स्टारच्या भूमिकेमुळे माझ्यापेक्षा माझा सहकलाकारच जास्त नर्व्हस झाल्याचं तिने म्हटलं.

काही भूमिका या पैशासाठी असतात तर काही भूमिका पॅशनसाठी असतात.

‘सुपर डिलक्स’ मधील भूमिका माझ्यासाठी एक पॅशन असल्याचं तिने म्हटलं आहे.

या सिनेमात तेलुगू सुपरस्टार अभिनेत्री समॅंथा प्रभू अक्किनेनी, मल्याळम स्टार फहाद फाझिल, तामिळ स्टार विजय सेतुपती यांच्याही भूमिका आहेत.

अभिनेता विजय सेतुपतीदेखील या सिनेमात एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे हा सिनेमा त्याच्यासाठीही अव्हानात्मक असल्याचं दिसून येतंय.

29 मार्चला ‘सुपर डिलक्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *