Thu. Dec 2nd, 2021

अभिनेत्री रसिका सुनील अडकली विवाहबंधनात

  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील अभिनेत्री रसिका सुनील विवाहबंधनात अडकली आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रसिका आणि अदित्य बिलागी ह्यांचा विवाह सोहळा पार पडला. रसिका आणि अदित्यने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना विवाह झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

 रसिका आणि अदित्य यांचा लग्नसोहळा गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. रसिका आणि अदित्यला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कुटुंब सदस्य आणि जवळील मित्रपरिवार तेथे उपस्थित होते.

 रसिका सुनील हीने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून रसिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मात्र मध्यातच रसिकाने ब्रेक घेतला आणि चित्रपटांच्या संबंधित अभ्यासक्रमासाठी अमेरिकेला गेली. अमेरिकेहून अभ्यासक्र पूर्ण करून मायदेशी परतताच रसिकाने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रसिका आणि अदित्यने त्यांच्या विवाहाचा फोटो शेअर केल्यामुळे कलाकारांकडून तसेच त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *